सोमवार, १६ जानेवारी, २०२३

चंद्रगड ते मढीमहल आव्हानात्मक भ्रमंती

चंद्रगड ते मढी महल (आर्थरसीट पॉईंट) हा प्राचीन ढवळे घाटमार्ग होता. चंद्रगड किल्ला, बहिरीची घुमटी, जोरचे पाणी हे प्राचीन अवशेष याची साक्ष देत आजही उभे आहेत. चंद्रगड ते मढी महल हा सह्याद्रीतील आव्हानात्मक ट्रेकपैकी एक आहे. या ट्रेक मध्ये कुठेही दोरी लावून चढावे लागत नाही, तरीही आपण समुद्रसपाटी पासून (४७०० फूट उंच) महाबळेश्वर पर्यंत एका दिवसात चढून जातो. त्यामुळे हा ट्रेक शरीराची व मनाची कसोटी पाहाणारा आहे. हा ट्रेक खालील प्रमाणे करता येईल.

१. ढवळे गाव ते चंद्रगड (लागणारा वेळ :- २ तास)
२. चंद्रगड ते बहिरीची घुमटी (लागणारा वेळ :- ५ तास)
३. बहिरीची घुमटी ते मढी महल (लागणारा वेळ :- २ तास)

पोहोचण्याचा मार्ग:

पोलादपूरहून महाबळेश्वरला जाणार्‍या रस्त्यावर पोलादपूरहून ८ किमीवर कापडे फाटा आहे. या फाट्यावरून १८ किमीवर चंद्रगडच्या पायथ्याचे ढवळे गाव आहे.ढवळे गावात पोहोचण्याआधी उमरठ या गावातील नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या स्मृती स्थळस भेट देता येईल.

सूचना :

१. या ट्रेकसाठी ढवळे गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. ही वाट फारशी वापरात नसल्याने, तसेच रस्त्यात मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही भेटत नसल्याने चुकण्यापेक्षा गाईड घेणे चांगले. 

२. वाट अनेकदा दाट झाडीतून जात असल्याने हात आणि पाय पूर्ण झाकणारे कपडे घालावेत.

३. ढवळेमधून चालायला सुरुवात केल्यावर फक्त घुमटीजवळील "जोरचे पाणी" येथे (अंदाजे ७ तास) पिण्यायोग्य पाणी आहे. त्यामुळे सोबत भरपूर पाणीसाठा बाळगावा.पावसाळा संपल्या नंतर लगेच जाणार असेल तर बहिरीची घुमटीच्या आधी पाणी मिळू शकते.

४. आर्थर सीट दर्शन च्या अगदी जवळ एक ठिकाणी सोप्या श्रेणीतील कातळारोहण आहे. कुठल्याही साधनाची गरज लागत नाही.

५. पावसाळ्यात चंद्रगड ते आर्थरसीट हा रेंज ट्रेक टाळावा. पावसाळ्यात ढवळे गावातून फक्त चंद्रगड करणे शक्य आहे.

६. कुठल्याहि ट्रेक ची श्रेणी हि वैयक्तिक व संघाचा अनुभव व सराव यानुसर वेगवेगळी ठरेल. या पदभ्रमंती साठी पूर्व तयारी व अनुभव असणे आवश्यक आहे.तरच हा आव्हानात्मक व साहसी प्रवास नक्कीच आनंददायी होईल.

धन्यवाद! 

प्रकाश जगदाळे,पेठ वडगाव (संपर्क- ९९२३४३१९१९) 



गहनगड/चंद्रगड/ढवळगड

गहनगड/चंद्रगड/ढवळगड

गहनगड/चंद्रगड/ढवळगड

गहनगड/चंद्रगड/ढवळगड


गहनगड/चंद्रगड/ढवळगड

गहनगड/चंद्रगड/ढवळगड

बहिरीची घुमटी

आर्थर सीट ठिकाण

बहिरीची घुमटी/ जोरचे पाणी

गहनगड/चंद्रगड/ढवळगड

चंद्रगड च्या जवळचा पाणवठा









अंजनी