रविवार, २२ मार्च, २०२६

जागतिक जल दिन

पाणी वाचवा जीवन वाचवा

जागतिक जल दिन २०२६ ची संकल्पना "पाणी आणि लिंगभाव समानता"ही असून, "जिथे पाणी वाहते, तिथे समानता वाढते" हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे . दरवर्षी २२ मार्च रोजी साजरा होणाऱ्या या २०२६ च्या मोहिमेत, पाण्याची उपलब्धता आणि लिंगभाव समानता यांच्यातील महत्त्वपूर्ण दुव्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, तसेच जल व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिला व मुलींना केंद्रस्थानी आणण्याचे उद्दिष्ट आहे.

२०२६ च्या संकल्पनेच्या प्रमुख बाबींमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

· लिंगभावावर लक्ष केंद्रित करणे: ही मोहीम अधोरेखित करते की पाण्याची संकटे ही लिंगनिरपेक्ष नाहीत; शिक्षण आणि सुरक्षिततेचा त्याग करून पाणी गोळा करण्याचा सर्वात मोठा भार अनेकदा महिला आणि मुलींवरच पडतो.

· समावेशक शासन: हा उपक्रम हक्कांवर आधारित दृष्टिकोनाचे आवाहन करतो, ज्याद्वारे जल व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रिया प्रणालींमध्ये महिलांचे नेतृत्व आणि समान सहभाग सुनिश्चित केला जातो.

· शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन: हा दिवस शाश्वत विकास उद्दिष्ट ६ (२०३० पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता) आणि उद्दिष्ट ५ (लिंग समानता साधणे आणि सर्व महिला व मुलींना सक्षम करणे) यांना समर्थन देतो.










शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

मनोहरगड

किल्ल्याची ऊंची :  3900

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग  

डोंगररांग : आंबोली

जिल्हा : सिंधुदुर्ग    

कोकणातील बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी आंबोली घाटवर व हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर- मनसंतोषगड हे जोडकिल्ले किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे छ. शिवाजी महाराजांचे या गडावर १ महिना वास्तव्य होते. तसेच कर्ली नदीचा उगम याच परीसरात होतो.मनोहर- मनसंतोष हे गड एका खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. यापैकी मनोहर गडावर पूरातन अवशेष आहेत व तो चढण्यासही सोपा आहे. तर मनसंतोषगड हा एक सुळका असून त्यावर चढण्यासाठी प्रस्तरारोहण (अवघड श्रेणी) करावे लागते.

इतिहास :

आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. तेथून रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला.

पहाण्याची ठिकाणे :

बुरूज,बांधीव पायर्यांवची वाट,तटबंदी,उध्वस्त प्रवेव्दार,पडक्या वाड्याचे अवशेष, विहिर,देवतांच्या मुर्त्या, तटबंदीतील शौचालय, नैसर्गिक गुहा. तसेच गडावरून मनसंतोषगड,नारायणगड, रांगणा, महादेवगड हे दुर्ग दिसतात.

पाण्याची सोय : गडावरील विहिरीत बारमाही पिण्याचे पाणी असते.

पोहोचण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत.

१ शिरशिंगे-गोठवेवाडीतून गडमाथा गाठण्यास २ तास लागत

२ शिवापूर गावातून गडमाथा गाठण्यास २ तास लागतात. 


















बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

महीपतगड-सुमारगड-रसाळगड

दुर्गम सह्याद्रीत वसलेले गिरी दुर्ग त्रिकुट एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे पुढील प्रमाणे सलग डोंगरयात्रा करून पहाता येतील.महीपतगड-सुमारगड-रसाळगड किवा रसाळगड- सुमारगड-महीपतगड.हे तिन्ही गड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले आहेत.या परिसरात घनदाट जंगल व हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे वाटाड्या सोबत घ्यावा.तसेच पाण्याचा पुरेसा साठा सोबत घेणे आवश्यक आहे.

महीपतगड (उंची ३१०० फुट)

गडाचा विस्तार प्रचंड आहे व घनदाट जंगल असल्यामुळे पूर्ण गड पाहण्यास चार तास लागतात.गडफेरी मध्ये अनेक भग्न अवशेष पाहायला मिळतात.गडावर जाण्यासाठी वाडी बेलदार गावातून ३० मिनिटे लागतात व दहिवली गावातुन ४ तास लागतात. रसाळगडवरून सुमारगड मार्गे ८ तास लागतात.

सुमारगड (उंची ३००० फुट)

गडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गड फेरीसाठी एक तास लागतो.गडावर जाण्यासाठी  महीपतगड ते सुमारगड ३ तास लागतात. रसाळगड ते सुमारगड ४.३० तास लागतात.गडावर जाण्यासाठी लावलेली शिडी पडलेली आहे त्यामुळे सोबत दोरी असल्यास झाडाला दोरी बांधून चढता येते .पुरेसा अनुभव असल्यास किंचित अवघड श्रेणीचे कातळारोहण करून गडावर प्रवेश करता येईल.

रसाळगड (उंची १८०० फुट)

गडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस दोन तास लागतात.वाडी पेठ मधून २० मिनिटात आपण गडावर पोहोचतो. महिपतगडवरून सुमारगड मार्गे रसाळगड ला पोहचण्यासाठी ८ तास लागतात.