सह्यद्रीच्या पर्वतरांगा मध्ये देश व कोकण जोडणाऱ्या अनेक दुर्गम घाटवाटा आहेत.चौकुळ -घारप -फुकेरी या पायवाटेस "फोण्याची पाज" म्हणतात.सध्या पक्के रस्ते तयार झाल्यामुळे या वाटेवर वहिवाट राहिलेली नाही.चौकुळ येथून दुर्गम वाटेने हनुमंतगडावर पोहचण्यास ५ ते ६ तास लागतात.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हनुमंतगड हा किल्ला वसलेला आहे. हा एक दुर्गम गिरिदुर्ग असून त्याची उंची ८०० फुट आहे.पायथ्याचे फुकेरी गाव चारही बाजूने डोंगराने वेढलेले आहे. गावातून थेट किल्ल्यावर जाण्यासाठी आता रस्ता झालेला आहे.फुकेरी गावात २ तोफा उलट्या पुरलेल्या पाहायला मिळतात तसेच महिषासुरमर्दिनी व इतर मंदिरे देखील पाहाता येतील.
![]() |
| खुळखुळा,कटुतिक्त,Rattlepod |















