किल्ल्याची ऊंची : 3900
किल्ल्याचा
प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग :
आंबोली
जिल्हा :
सिंधुदुर्ग
कोकणातील बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी आंबोली घाटवर व हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर- मनसंतोषगड हे जोडकिल्ले किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे छ. शिवाजी महाराजांचे या गडावर १ महिना वास्तव्य होते. तसेच कर्ली नदीचा उगम याच परीसरात होतो.मनोहर- मनसंतोष हे गड एका खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. यापैकी मनोहर गडावर पूरातन अवशेष आहेत व तो चढण्यासही सोपा आहे. तर मनसंतोषगड हा एक सुळका असून त्यावर चढण्यासाठी प्रस्तरारोहण (अवघड श्रेणी) करावे लागते.
इतिहास :
आग्र्याहून सुटका
झाल्यावर शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. तेथून रांगणा गडाला घातलेला वेढा
उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून
१३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे
तब्बल ३४ दिवस मुक्काम केला.
पहाण्याची ठिकाणे
:
बुरूज,बांधीव पायर्यांवची वाट,तटबंदी,उध्वस्त प्रवेव्दार,पडक्या वाड्याचे अवशेष, विहिर,देवतांच्या मुर्त्या, तटबंदीतील शौचालय, नैसर्गिक गुहा. तसेच गडावरून मनसंतोषगड,नारायणगड, रांगणा, महादेवगड हे दुर्ग दिसतात.
पाण्याची सोय : गडावरील विहिरीत बारमाही पिण्याचे पाणी असते.
पोहोचण्याच्या
वाटा : गडावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत.
१ शिरशिंगे-गोठवेवाडीतून
गडमाथा गाठण्यास २ तास लागत
२ शिवापूर गावातून गडमाथा गाठण्यास २ तास लागतात.













कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा