सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे.त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती" ही रचना आपल्याला मोरोशी गावाजवळ भैरवगडावरती पहायला मिळते. लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसवलेला आहे.हा किल्ला सर करण्यासाठी कातळारोहण करण्यासाठी लागणारे साहित्य व पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.-शैलभ्रमर,क.वडगाव (९९२३४३१९१९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा