गुरुवार, २५ जानेवारी, २०२४

मुडागड-काजिर्डा घाट भ्रमंती

मुडागड हा कोल्हापुर जिल्ह्यतील एक वनदुर्ग असून त्याची उंची २३०० फुट आहे.प्राचिन काळापासून कोकणातून घाटावर जाण्यासाठी अनेक घाटमार्गांचा वापर केला जात असे. या घाटमार्गांनी कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये नेला जात असे. या घाटमार्गांचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले. कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्‍या "काजिर्डा घाटाच्या" रक्षणासाठी मुडागड हा किल्ला बांधण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील पडसाळी गावातून कोकणातील राजापूर जवळील काजिर्डा गावात हा घाट उतरतो. मुडागड किल्ल्यावर फारसे अवशेष नसले तरी तो किल्ला पाहाण्यासाठी करावा लागणारी दाट जंगलातील पदभ्रमंती फार सुंदर आहे.छ.शाहू महाराजांनी हा परिसर शिवअरण्य घोषित केला व हत्ती साठी राखीव ठेवला.हत्ती साठी दोन तलाव तयार केले ते आज हि पाहता येतील.

दाट अरण्यात गडाचे अवशेष हरवलेले आहेत. गड असलेला डोंगर चढताना गडाच्या तटबंदीचे कातीव चिरे ठिकठिकाणी पडलेले आढळतात. गडाच्या तटबंदीच्या भिंतीच्या अखेरच्या अवशेषांवरुन आपला गडमाथ्याचा प्रवेश होतो. गडावर दाट झाडी माजलेली आहे. अनेक वृक्षांच्या मूळात गडावरील वास्तूंचे अवशेष अडकलेले दिसतात. गडमाथा आटोपशीर आहे माथ्याच्या टोकावरुन पडसाळी गावातील धरणकाजिर्डा घाट व गगनगड पाहाता येतो.कोल्हापुर - बाजारभोगाव - पडसाळी (पडसाळी गावातून मुडागड पाहून परत येण्यास साधारणत: ५ तास लागतात

काजिर्डा घाट वाट उतरण्यासाठी १.५ लागतो व चढाई साठी २.५ तास लागतात.काजिर्डा गावाजवळील धबधबा पाहत येईल.

-शैलभ्रमर,कसबा वडगाव (९९२३४३१९१९) 

जांभळी नदी 


बुरुजाचे अवशेष 

शिव मंदिर अवशेष 

हत्ती तलाव 

कोकण कडा 

शिव मंदिर अवशेष

क्षणभर विसावा 


दूरवर दिसणारा गगनगिरी गड व सह्याद्री



शिकेकाई 

प्रतिबिंब 
मुडागड कोकण कड्यावरून दिसणारा काजीर्डा घाट परिसर 

निसर्ग प्रेमी 

उगवाई देवी मंदिर
 

मुडागड

काजिर्डा गावातून मुडागड


काजिर्डा गावाजवळील धबधबा




३ टिप्पण्या:

निनावी म्हणाले...

मस्त

निनावी म्हणाले...

खूप छान ट्रेक, उत्कृष्ट नियोजन...

निनावी म्हणाले...

👌