समर्थांच्या दुर्गम ठिकाणी वसलेल्या अनेक घळी पैकी ही घळ आहे.समर्थांनी या ठिकाणी चातुर्मास केला होता अशी इतिहासात नोंद सापडते.कराड-चिपळूण रस्त्यावर पाटणपासून २४ कि.मी. अंतरावर हेळवाक गाव आहे. या गावाच्या जवळच्या डोंगरावर ही घळ आहे.या घळीवरून बाराही महिने धबधबा पडतो. हे पाणी पिण्यायोग्य आहे. हेच पाणी पुढे कोयनेत जाऊन मिळतं. स्थानिक लोक या पाण्याला रामनदी म्हणतात.मळलेल्या पायवाटेने एक तासात ह्या ठिकाणी पोहोचता येते.
नदी खळाळती बळे । जळे
बहुत चंचळे ।
फुगे चळण वाकणे । निरे
विराजीती गुणे ।।
अनेक वृक्ष दाटले । निबीड
दाट थाटले ।
वने वने बहु वने । अचाट
दाटली घने ।
बहुत बोलती खगे । चमक
दावीली मृगे ।
कुसुम वाटीका भरे ।
विगुतली मधुकरे ।।
समर्थांनी केलेल्या या
घळीचं हे यथार्थ वर्णन आजही इथे अनुभवायला मिळतं.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा